GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघातर्फे आदिवासी पाड्यांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप

Gramin Varta
26 Views

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघातर्फे ठाणे जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील आदिवासी पाड्यांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.

नवी मुंबईतील रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाने एक हात मदतीचा, चला आपण पण मदत करू या या शीर्षाखाली माजगाव (ता. खालापूर) येथील आदिवासी पाड्यात जाऊन विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. तसेच गरजू आदिवासी महिलांना साड्या आणि गृहोपयोगी साहित्याचे वितरण करण्यात आले.

शालेय विद्यार्थी शैक्षणिक दत्तक योजना आणि आदिवासी महिला सन्मान योजना या प्रोत्साहनात्मक सामाजिक उपक्रमाला संघाचे अध्यक्ष कमलाकरदादा कदम यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. नियोजन समिती सदस्य तसेच उपाध्यक्ष संजय दरेकर सचिव संतोष मोरे, खजिनदार अशोक तावडे, सहसचिव मनोहर भोसले, मंगेश महाडिक, सहखजिनदार स्वप्नील देसाई, सुदेश शिर्के समस्त कार्यकारिणी सदस्यांचे मोलाचे योगदान लाभले. तसेच सर्व सभासद, देणगीदार आणि हितचिंतक यांनी चांगले सहकार्य केले.

कार्यक्रमास माजगावमधील पौदवाडी-आंबिवली (आदिवासी पाडा) येथील शालेय विद्यार्थी, महिला तसेच ग्रामस्थ सरपंच सौ. दीपाली नरेश पाटील, समाजसेवक नरेश पाटील, अनंत पाटील, खालापूरचे उपसभापती जयवंत पाटील मुख्याध्यापक गौतम कांबळे, शिक्षक श्री. पिंगळे, अन्य शिक्षक, आशावर्कर, अंगणवाडी सेविका आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Total Visitor Counter

3374692
Share This Article