GRAMIN SEARCH BANNER

भारतीय कर्णबधिर संघाला पहिल्या आशिया कप टी-२० स्पर्धेचे अजिंक्यपद

Gramin Varta
90 Views

दिल्ली: सूर्यकुमार यादवची टीम इंडिया सध्या २०२६ च्या टी-२० विश्वचषकात व्यस्त आहे. संपूर्ण देश संघाच्या विजयासाठी प्रार्थना करत आहे. दरम्यान, भारताच्या कर्णबधिर संघाने पहिली आशिया कप टी-२० स्पर्धा जिंकून इतिहास रचला आहे.

अंतिम फेरीत भारतीय संघाने श्रीलंकेला सहा विकेट्सने एकतर्फी पराभव करून शानदार कामगिरी केली.

भारतीय संघाने यापूर्वी स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात श्रीलंकेला चार विकेट्सने पराभूक करत विजयी सलामी दिली होती. त्यानंतर त्यांनी नेपाळवर १० विकेट्सने दणदणीत विजय मिळवत आपला प्रवास सुरू ठेवला. श्रीलंकेने नेपाळविरुद्ध स्पर्धेतील तिसरा सामना सहा विकेट्सने जिंकला. त्यानंतर श्रीलंकेने नेपाळला १५७ धावांनी मात दिली. त्यामुळे भारताला एका धावेने विजय मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागले. पुढच्या सामन्यात भारताने नेपाळला नऊ विकेट्सने पराभूत करत अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले.

भारताच्या ऐतिहासिक विजयाचा शिल्पकार साई आकाश होता. त्याने अंतिम सामन्यात बॅट आणि बॉल दोन्हीमध्ये चमकदार कामगिरी केली. त्याने १४ चेंडूत २७ धावा केल्या आणि नंतर दोन विकेट्स घेतल्या. त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. श्रीलंकेच्या क्रिकेटपटूंनी स्पर्धेचा सर्वोत्तम फलंदाज आणि सर्वोत्तम गोलंदाज पुरस्कार पटकावले.

श्रीलंकेचा क्रिकेटपटू गिमाडो एल. मल्कमला १९६ धावा केल्याबद्दल सर्वोत्तम फलंदाज म्हणून निवडण्यात आले. त्याने सात विकेट्स घेतल्यामुळे त्याला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला. श्रीलंकेचा गिहान लासिडू डी सिल्वा हा देखील स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज होता, त्याने स्पर्धेत सर्वाधिक १० विकेट्स घेतल्या. ऐतिहासिक आशिया कप जिंकल्याबद्दल भारतीय संघाचे मोठ्या प्रमाणात अभिनंदन होत आहे.

Total Visitor Counter

3367002
Share This Article