GRAMIN SEARCH BANNER

रामदास कदम हे छमछमदास कदम, भास्कर जाधवांचा हल्लाबोल

Gramin Varta
12 Views

मुंबई: मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईतील नेस्को सेंटर येथे २ ऑक्टोबर रोजी पार पडला. शिवसेनेच्या फुटीनंतर दोन्ही शिवसेनेचे वेगवेगळे दसरा मेळावे घेतले जाऊ लागले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचा हा चौथा दसरा मेळवा असून शिवसैनिकांनी नेस्को सेंटरवर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. हा मेळावा सुरुवातीला आझाद मैदानावर होणार होता परंतु पावसाची स्थिती पाहता हा मेळावा नेस्को सेंटर येथे घेण्याचे ठरवण्यात आले. या मेळाव्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री उदय सामंत, मंत्री प्रताप सरनाईक तसेच इतर मंत्री, नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अनेक नेत्यांनी भाषणे केली.

मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईतील नेस्को सेंटर येथे २ ऑक्टोबर रोजी पार पडला. शिवसेनेच्या फुटीनंतर दोन्ही शिवसेनेचे वेगवेगळे दसरा मेळावे घेतले जाऊ लागले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचा हा चौथा दसरा मेळवा असून शिवसैनिकांनी नेस्को सेंटरवर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. हा मेळावा सुरुवातीला आझाद मैदानावर होणार होता परंतु पावसाची स्थिती पाहता हा मेळावा नेस्को सेंटर येथे घेण्याचे ठरवण्यात आले. या मेळाव्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री उदय सामंत, मंत्री प्रताप सरनाईक तसेच इतर मंत्री, नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अनेक नेत्यांनी भाषणे केली.


दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्यानंतर दोन दिवस त्यांचा मृतदेह तसाच ठेवला होता. तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या हाताचेही ठसे घेण्यात आले होते. हे ठसे नेमके कशासाठी घेण्यात आले होते? असा खळबळजनक आरोप एकनाथ शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला, आणि रामदास कदमांच्या या आरोपाने खळबळ माजली आहे. यावर आता ठाकरे गटाचे नेते आक्रमक झाल्याचे चित्र आहे. शिवसेना ठाकरे गटाचे विधानसभा गटनेते आमदार भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांचा छमछमदास कदम असा उल्लेख करत टीका केली आहे.

कुवत नसलेल्या माणसांकडून टीका सुरू आहे. तसेच तरंडास कदम यांना ‘बारदास कदम’ म्हंटले आहे. कदमांसारख्या श्वानांना आपण किंमत देत नाही. रामदास कदम तुला मुंबईच्या नगरसेवकांमधून दोन वेळा उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवर पाठवलं. मुंबईकरांसाठी तुम्ही काय केलं. बाळासाहेबांचे शिवसैनिक असल्याचा आव आणायचा. हे बारदास कदम, महिलांना नाचवून त्याच्यावर कमाई करणाऱ्यांना भXXXXX म्हणतात, अशा लोकांकडून दुसरी काही अपेक्षा नाही. तसेच, रामदास कदम हे शिंदे गटात गेल्यानंतर त्यांना कोणतीही मोठी जबाबदारी सोपवली नाही. त्यामुळे चर्चेत राहण्यासाठी त्यांच्याकडून अशी वक्तव्ये सुरू आहेत. नारायण राणे हे उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बोलत नाहीत, त्यांच्या ऐवजी आता रामदास कदम बोलू लागले आहेत. त्यामुळे त्यांना असं करायला कोण सांगतंय हे लक्षात घ्या.

Total Visitor Counter

2648125
Share This Article