लांजा : शुक्रवारी सायंकाळपासून बेपत्ता असलेल्या माजळ येथील विशाल बाळकृष्ण माजळकर (वय ३५ वर्ष) या तरुणाचा मृतदेह शनिवारी २० सप्टेंबर रोजी कोंड्ये-झापडे धरणात आढळून आला.
तालुक्यातील माजळ गावातील माजळकरवाडी येथील विशाल बाळकृष्ण माजळकर (वय ३५) हा लांजा येथील एका हॉटेलमध्ये कामाला होता. तो आपल्या माजळ या गावी पत्नी, आई आणि दीड वर्षांचा मुलगा यांच्या सोबत राहत होता.
विशाल माजळकर हा शुक्रवारी १९ सप्टेंबर रोजी दुपारपासूनच बेपत्ता होता. तो घरी न परतल्याने आणि मोबाईलवर देखील कॉन्टॅक्ट होत नसल्याने गावकरी त्याचा शोध घेत होते. शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता विशाल याची मोटरसायकल कोंडये-झापडे धरणाच्या किनाऱ्यावर आढळून आली होती. या गाडीच्या डिकीत त्याचा मोबाईल आणि पैसे त्यांनी ठेवले होते. त्याच्यात चप्पल देखील होती. त्यामुळे गावकरी, नातेवाईक यांनी धरण परिसरात त्याचा शोध घेतला, मात्र तो आढळून आला नाही.
त्यानंतर शनिवारी २० सप्टेंबर रोजी त्यानंतर वाडकऱ्यांनी पुन्हा धरण परिसरात त्याचा शोध घेतला असता बेपत्ता विशाल माजळकर याचा मृतदेह धरणाच्या पाण्यात आढळून आला.
लांजा : बेपत्ता तरुणाचा मृतदेह सापडला, परिसरात हळहळ, दीड वर्षाचा मुलगा पोरका
