रायगड/ उदय दणदणे : महाड तालुक्यातील समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेली, जनमानसात अढळ स्थान निर्माण करणारी विभग फाउंडेशन संस्थेचे संस्थापक/ अध्यक्ष सुशांत जाबरे आणि संस्थेचे पदाधिकारी सत्यवान यादव,संतोष धारशे, समीर रेवाळे, राहुल शिंदे आदी प्रमुख पदाधिकारी यांनी नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने तालुक्यातील जिल्हा परिषद मतदारसंघातील प्रत्येक गावात दुर्गा मातेचे दर्शन घेतले,त्याचबरोबर गाव वाडी वस्तीवर जाऊन ग्रामस्थ जनतेच्या समस्या जाणून घेतल्या.
“एकच ध्यास रायगडचा विकास” संकल्पनेचा व्रत घेऊन विभग फाऊंडेशन संस्थापक सुशांत जाबरे यांनी आजवर गोरगरीब, वंचित घटकांना आधार देण्याबरोबरच महिला सक्षमीकरण, युवकांना रोजगार व कौशल्य विकास साधण्यावर भर दिला आहे.