GRAMIN SEARCH BANNER

देवरुख: खा. नारायण राणे यांच्या निधीतून दिव्यांगांना वस्तूंचे वाटप

Gramin Search
7 Views

देवरुख : रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांच्या निधीतून दिव्यांगांसाठी व अपंगांसाठी भाजपा संगमेश्वर तालुका अध्यक्ष रूपेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये देवरूख येथील पंचायत समिती कार्यालयात वस्तूंचे वाटप करण्यात आले.

या वस्तूंमध्ये दिव्यांग बांधवांसाठी बॅटरीवर चालणारी सायकल, सेन्सर बॅटरी, कानाचे मशीन, याचबरोबर दिव्यांगांना लागणारी अत्याधुनिक साधने यांचा समावेश होता.

यावेळी गटविकास अधिकारी शिंदे, भारतीय जनता पक्षाचे संगमेश्वर तालुका उपाध्यक्ष अभिजित सप्रे, तालुका सरचिटणीस सचिन बांडागळे, तालुका सोशल मीडिया अध्यक्ष सितेश पर्शराम, युवा मोर्चा देवरूख शहर अध्यक्ष पुष्कर शेट्ये, प्रमोद शिंदे, विस्तार अधिकारी घुले, पारशे उपस्थित होते.

Total Visitor Counter

2648055
Share This Article