GRAMIN SEARCH BANNER

ओझरखोल येथे व्हॅगनार कार थेट दरडीत घुसली

Gramin Varta
30 Views

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात; सुदैवाने प्रवासी बचावले

तुषार पाचलकर / राजापूर

मुंबई-गोवा महामार्गावर ओझरखोल येथे शनिवारी रात्री एक व्हॅगनार कार थेट दरडीत घुसल्याची घटना घडली. चालकाला झोप अनावर झाल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, एमएच-04 जीएम 8033 ही व्हॅगनार कार मुंबईहून रत्नागिरीच्या दिशेने येत होती. ओझरखोल घाटाजवळ पोहोचताच चालकाला झोप लागल्याने कारवरील नियंत्रण सुटले आणि वाहन थेट दरडीमध्ये जाऊन आदळले.

अपघातानंतर काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. सकाळी स्थानिकांच्या मदतीने आणि यंत्रणेच्या सहकार्याने कार बाहेर काढण्यात आली. या दरम्यान कार माती व दगडांनी पूर्णपणे माखलेली होती. या अपघातात मोठे आर्थिक नुकसान झाले असून, सुदैवाने जीवितहानी टळल्याने स्थानिकांनी सुटकेचा श्वास सोडला.

Total Visitor Counter

3368248
Share This Article