GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी: कदमवाडी येथे विद्यार्थ्यांच्या रिक्षाला डंपरची जोरदार धडक
रिक्षाचालकासह एक विद्यार्थी जखमी

Gramin Varta
173 Views

रत्नागिरी : शहरात कदमवाडी येथे सोमवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या एका रिक्षाला डंपरने जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात रिक्षाचालकासह एक विद्यार्थी जखमी झाला असून, त्यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

जाहीद अली अब्दुल रहीम धामस्कर (वय ५०, रा. मजगाव, रत्नागिरी) हे १३ ऑक्टोबर रोजी त्यांची रिक्षा (एमएच ०८ क्यू ७१६८) घेऊन मेस्त्री हायस्कूल ते मजगाव या मार्गावर जात होते. त्यांच्या रिक्षात मेस्त्री हायस्कूलमधील तीन विद्यार्थी होते. सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास रिक्षा कदमवाडी येथे आली असता, मजगाववरून रत्नागिरीकडे येणाऱ्या एका डंपरने जाहीद धामस्कर यांच्या रिक्षाला धडक दिली.

हा अपघात इतका भीषण होता की, यात रिक्षाचालक जाहीद धामस्कर आणि रियान सावकार नावाचा विद्यार्थी जखमी झाले. अपघातानंतर लगेचच जखमींना उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची नोंद पोलिसांत करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनाला डंपरने धडक दिल्याने, शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Total Visitor Counter

2651784
Share This Article