GRAMIN SEARCH BANNER

संगमेश्वर : बावनदी येथून दुचाकी चोरीला; ५० हजारांचा ऐवज लंपास

संगमेश्वर: बावनदी येथील खातू यांच्या किराणा दुकानासमोर रस्त्याच्या कडेला उभी केलेली ५० हजार रुपये किमतीची होंडा युनिकॉर्न दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही चोरी २४ एप्रिल २०२५ रोजी दुपारी ४.३० ते ८ जून २०२५ रोजी सायंकाळी ४.०० च्या दरम्यान घडली असून, २४ जून २०२५ रोजी रात्री ८.१२ वाजता संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुभम सुनील शिवलकर (२९, रा. जाकीमिऱ्या, आलावा पाटीलवाडी, ता. जि. रत्नागिरी) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या वडिलांच्या नावावरील (एम.एच.०८ ए.डब्ल्यु ७५०१) या क्रमांकाची होंडा युनिकॉर्न (ग्रे रंगाची) दुचाकी त्यांनी त्यांचा मित्र आयुष समीर सावंत याला देवरुख येथे जाण्यासाठी दिली होती.

देवरुखवरून परत येत असताना गाडीची चैन तुटल्यामुळे आयुषने ती गाडी बावनदी जवळील देवरुखकडे जाणाऱ्या रस्त्यावर, खातू यांच्या किराणा दुकानासमोर रस्त्याच्या बाजूला उभी करून ठेवली होती. त्यानंतर, शुभम शिवलकर देवरुखला जात असताना त्यांनी बावनदी येथे आपली गाडी पाहिली असता, ती जागीवर दिसली नाही. त्यांनी आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला, परंतु गाडी मिळून आली नाही.
अखेरीस, आपली गाडी चोरून नेल्याची खात्री पटल्याने शुभम शिवलकर यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास संगमेश्वर पोलीस करत आहेत.

Total Visitor Counter

2475383
Share This Article