रत्नागिरी : कुवे तिठा (ता. लांजा) येथे दुचाकीवरील ताबा सुटून अपघात झाला. या अपघातामध्ये दुचाकीस्वाराच्या पाठीमागे बसलेली महिला जखमी झाली. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
गणपत धोंडू गुरव (वय ५२, रा. कुवे, ता. लांजा) व अनुराधा किसन गुरव (वय ४५, रा. चुनाकोळवण, राजापूर, सध्या रा. खेड) अशी जखमींची नावे आहेत. ही घटना गुरुवारी (ता. २५) दुपारी दीडच्या सुमारास
कुवेतिठा येथील रस्त्यावर घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जखमी हे गणपत गुरव हे दुचाकीने लांजा येथून सोबत अनुराधा गुरव यांना घेऊन कुवे येथे जात असताना त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटून अपघात झाला. या अपघातामध्ये दोघे जखमी झाले. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत जिल्हा रुग्णालयाच्या पोलिसचौकीत नोंद करण्यात आली आहे.
लांजा कुवे येथे दुचाकी अपघातात दोघे जखमी
