GRAMIN SEARCH BANNER

महायुतीच्या विजयी घोषणा; चिपळूणमध्ये पालिका सभापतींचा पदग्रहण सोहळा

Gramin Varta
113 Views

चिपळूण : महायुतीचा विजय असो, अशा जोरदार घोषणांत चिंचनाका येथून चिपळूण नगर पालिकेपर्यंत भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीनंतर चिपळूण नगर पालिकेतील महायुतीच्या उपनगराध्यक्ष व विविध समिती सभापतींचा पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला.

महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते रॅलीने नगरपरिषद परिसरात दाखल झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून “छत्रपती शिवाजी महाराज की जय” अशा घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर उपनगराध्यक्ष व नियोजन समिती सभापती रूपाली दांडेकर, बांधकाम समिती सभापती विक्रांत उर्फ कपिल शिर्के, पाणीपुरवठा समिती सभापती निहार कोवळे, महिला व बालकल्याण समिती सभापती रसिका देवळेकर, शिक्षण व क्रीडा समिती सभापती हर्षाली पवार, आरोग्य समिती सभापती शुभम पिसे यांचा पदग्रहण सोहळा भाजप नेते प्रशांत यादव, जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, शिवसेना तालुकाप्रमुख बापू आयरे, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, सौ. आरती सकपाळ, महायुतीचे नेते व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी भाजपचे गटनेते शशिकांत मोदी, स्थायी समिती सदस्य उदय जुवळे, प्रमोद बुरटे, वैशाली निमकर, संदीप भिसे, नगरसेवक विकी लवेकर, शितल रानडे, अंजली कदम, निलम जाधव, शिवसेना गटनेते अंकुश आवले, गणेश आग्रे, महिला व बालकल्याण समिती उपसभापती पल्लवी मोहन महाडिक, ज्येष्ठ शिवसैनिक बाळ परांजपे, माजी नगरसेवक आशिष खातू, विजय चितळे, संदेश पवार, संदेश ओक, सारिका भावे, नयन साडविलकर, महंमद फकीर, महिला आघाडी शहर प्रमुख प्राजक्ता टकले, उदय गांधी, सुयोग चव्हाण, दयाजवळ, धीरज नलावडे, कानडे, पप्पू लहाने, माजी नगरसेवक करामत मिठागरे, संदेश किंजळकर आदींसह शिवसेना–भाजप महायुतीचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Total Visitor Counter

3366906
Share This Article