रत्नागिरी : बँक ऑफ इंडिया पुरस्कृत स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था रत्नागिरी यांचेमार्फत 5 ते 14 जुलै या दहा दिवसाच्या कालावधीत मोफत टूरिझम प्रशिक्षण सुरु होणार आहे. प्रशिक्षणामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा इतिहास, किल्ले, समुद्र, खाद्य संक्रती, मंदिरे, पक्षी निरीक्षण, पर्यटक व्यवस्थापन इत्यादी मुख्य विषयी विषयतज्ञ लोकांचे मार्गदर्शन होणार आहे. त्याचबरोबर उद्योजकता विकास, मार्केटिंग, यशस्वी उद्योगास भेट, व्यक्तिमत्व विकास इ. असणार आहे.
प्रशिक्षण हे पूर्णपणे मोफत असून चहा, नाश्ता, जेवण व निवास व्यवस्था देखील विनामूल्य आहे. प्रशिक्षण घेण्यासाठी वयोमर्यादा 18 वर्ष पूर्ण व 45 वर्षापर्यंत आहे. अर्जदार रत्नागिरी जिल्ह्यातील रहिवासी असावा. अर्जदार हा उमेद पुरस्कृत बचत गटातील सदस्य किवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती किंवा दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती किंवा प्राधान्य कुटुंब लाभार्थी किंवा अंत्योदय लाभार्थी यापैकी कोणत्याही एका अटीमध्ये पात्र असलेल्या उमेदवाराला अर्ज करता येईल. त्यामुळे पर्यटन क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. अर्ज भरण्यासाठी आधारकार्ड, रेशनकार्ड, पॅनकार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, यांची प्रत्येकी झेरॉक्स आणि एक पासपोर्ट साईझ फोटो इ. कागदपत्र आवश्यक आहेत. स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था, निसर्ग वसाहत, वक्रतुंड अपार्टमेंट जवळ, शांती नगर रोड, नाचणे, रत्नागिरी. संपर्क क्र. 9834015522 येथे अर्ज सादर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
स्टार स्वयंरोजगार’तर्फे मोफत टूरिझम प्रशिक्षण
