दापोली : तालुक्यातील एका दहा वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकाविरोधात दाभोळ सागरी पोलिस ठाणे येथे बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षणअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्याला न्यायालयात हजर केले असता दापोली न्यायालयाने त्याला २१ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्याला निलंबित केल्याचे जाहीर केले आहे.
एका प्राथमिक शाळेतून पीडित दहा वर्षीय बालिका आपल्या घरी चालत जात असताना संशयित किशोर काशीराम येलवे (रा. आगरवायंगणी, ता. दापोली) हा ७ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास दुचाकीवर बसून पीडित मुलीला तिच्या घरी सोडण्यासाठी गेला होता. ही बालिका घरात एकटीच असल्याचे व ती अल्पवयीन असल्याचा फायदा घेत ही मुलगी घरात कपडे बदलण्यासाठी गेली असता संशयित तिच्या पाठीमागे जाऊन त्याने तिच्यासोबत अश्लील चाळे केले. तसेच कोणाला सांगितलेस तर बघ, अशी धमकी दिली होती आणि तो तिथून निघून गेला होता. या पीडित बालिकेने घडलेला सर्व प्रकार आपल्या आजीला सांगितला. पीडित बालिकेच्या आजीने तत्काळ दाभोळ सागरी पोलिस ठाणे गाठून संशयिताविरोधात तक्रार दाखल केली होती. दाभोळ सागरी पोलिसांत गुन्हा दाखल केला. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता संशयिताला २१ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात असल्याचे दाभोळ पोलिसांनी सांगितले.
दापोलीत विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला न्यायालयीन कोठडी
