GRAMIN SEARCH BANNER

ऋषभ शेट्टीचा ‘कांतारा चॅप्टर १’ चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

Gramin Varta
81 Views

मुंबई: ऑल टाइम ब्लॉकबस्टर ठरलेला ‘कांतारा’ चित्रपट गाजवल्यानंतर आता ऋषभ शेट्टी ‘कांतारा: चैप्टर 1’ घेऊन येत आहेत. हा ‘कांतारा’चा प्रीक्वेल आहे.

या चित्रपटाचा ट्रेलर आता प्रदर्शित झाला असून ऋषभ शेट्टीने यावेळीही प्रेक्षकांना थक्क केले आहे.

चित्रपटाचा हिंदी ट्रेलर ऋतिक रोशनने लाँच केला आहे, तर मल्याळम ट्रेलर पृथ्वीराज सुकुमारन, तेलुगू ट्रेलर प्रभास, आणि तमिळ ट्रेलर शिवकार्तिकेयन यांनी रिलीज केला आहे.ऋषभ शेट्टीच्या पूर्वजांची कहाणी या चित्रपटात मांडली जाणार आहे. ट्रेलरमध्ये व्हिएफएक्सचा अप्रतिम वापर केला गेला आहे, आणि संगीत इतकं प्रभावी आहे की अंगावर शहारे येतात. या चित्रपटाचा ट्रेलर ‘कांतारा’ची आठवण करून देतो. यावेळी मोठा सेट, सुंदर लोकेशन्स, आणि अधिक भव्यता पाहायला मिळते.ऋषभ शेट्टी अॅक्शन अवतारात अतिशय प्रभावी वाटत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांना खूप आवडला असून सोशल मीडियावर सर्वत्र त्याचीच चर्चा सुरु आहे.

‘कांतारा: चैप्टर 1’ चे दिग्दर्शनही ऋषभ शेट्टी यांनीच केले आहे. चित्रपट 2 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ऋषभ शेट्टीसह सप्तमी गौडा, जयराम, रुक्मिणी वसंत, गुलशन देवय्या हे कलाकार दिसणार आहेत.हा चित्रपट मोठ्या प्रमाणावर आणि भव्यतेने बनवण्यात आला आहे. रिपोर्टनुसार, फिल्मचं बजेट 125 कोटी रुपये आहे.याआधी ‘कांतारा’ फक्त 16 कोटींच्या बजेटमध्ये बनवली गेली होती आणि 2022 मध्ये रिलीज झाल्यावर तिने बॉक्स ऑफिसवर 400 कोटींहून अधिक कमाई केली होती.

Total Visitor Counter

3198816
Share This Article