गणपतीपुळे समुद्रात बुडणाऱ्या १५ वर्षीय मुलाला जीवरक्षकांनी दिले जीवनदान

saurabhsalvi26@gmail.com
1 Min Read

गणपतीपुळे/ वैभव पवार:  गणपतीपुळे समुद्रकिनारी मंगळवारी दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या थरारक घटनेत १५ वर्षीय मुलाला बुडताना जीवरक्षकांनी वेळीच हस्तक्षेप करून वाचवले. नंदूरबार जिल्ह्यातून देवदर्शन व पर्यटनासाठी आलेल्या पथकात या मुलाचाही समावेश होता.

नंदूरबार जिल्ह्यातून एकूण १९ जण गणपतीपुळे येथे आले होते. समुद्रकिनारी खेळण्यात मग्न असताना संबंधित मुलाला समुद्रात जाण्याचा मोह आवरता आला नाही. पाण्याचा अंदाज न आल्याने तो समुद्रात उतरला आणि काही वेळातच बुडू लागला. समुद्रात उतरल्यानंतर त्याला चक्कर आल्याने तो अडचणीत सापडला. हा प्रकार इतरांच्या लक्षात येण्यापूर्वीच तो पाण्यात बुडत असल्याचे गणपतीपुळे येथील जीवरक्षक व रायडिंग करणाऱ्यांच्या निदर्शनास आले.

जीवरक्षकांनी तत्काळ धाव घेऊन बेशुद्ध अवस्थेत असलेल्या मुलाला समुद्रातून बाहेर काढले. त्यानंतर त्याला तातडीने मालगुंड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर अधिक उपचारासाठी त्याला रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले असून सध्या अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *