संगमेश्वर: गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे संगमेश्वर तालुक्यातील माखजन बाजारपेठ, संगमेश्वर आणि आरवली परिसराला पुराचा मोठा फटका बसला आहे. गडनदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने माखजन बाजारपेठेत सलग तिसऱ्या दिवशीही पुराचे पाणी शिरले, ज्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
येत्या रक्षाबंधन, गोकुळाष्टमी आणि गणेशोत्सवासाठी दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात माल भरलेला असल्यामुळे व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. अचानक आलेल्या पाण्यामुळे अनेक व्यापाऱ्यांना दुकानातील माल बाहेर काढता आला नाही. त्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
माखजन बाजारपेठेतून सरंद गावाकडे जाणारा रस्ताही गडनदीच्या पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. याचबरोबर, शास्त्री, सोनवी आणि असावी नद्यांनीही धोका पातळी ओलांडली असून
या मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.