GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी वरवडेतील तरुणाचा आकस्मिक मृत्यू

Gramin Varta
30 Views

रत्नागिरी : तालुक्यातील वरवडे येथील राकेश कृष्णा पाष्टे (वय ४०) यांचा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

२२ सप्टेंबर रोजी घरी असताना त्यांना अचानक प्रचंड घाम येऊ लागला आणि डोळे फिरू लागले. नातेवाईकांनी तत्काळ त्यांना जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीदरम्यान त्यांना मृत घोषित केले.

या प्रकरणी रत्नागिरी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

Total Visitor Counter

3366983
Share This Article