GRAMIN SEARCH BANNER

राजापूर महायुतीची उमेदवारांची धडाकेबाज घोषणा; नगराध्यक्षपदी श्रुती ताम्हनकर मैदानात

Gramin Varta
292 Views

राजापूर (वार्ताहर): राजापूर नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघा एकच दिवस शिल्लक असताना, महायुतीने रविवारी लांजा येथे मोठे शक्तीप्रदर्शन करत आपल्या उमेदवारांची धडाकेबाज घोषणा केली. शिवसेना–भाजप–राष्ट्रवादी (अजित पवार गट) महायुतीने नगराध्यक्षपदासह २० पैकी १६ जागांसाठी उमेदवार निश्चित केले असून यावेळी राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे.

नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून सौ. श्रुती श्रीकांत ताम्हनकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले असून त्यांना धनुष्यबाण चिन्हावर उमेदवारी देण्यात आली आहे. आमदार किरण सामंत यांनी त्यांचे स्वागत करत ताम्हनकर यांच्या निवडीमुळे महायुतीची बाजू अधिक भक्कम झाली असल्याचा विश्वास व्यक्त केला.

१० नोव्हेंबरपासून अर्ज दाखल प्रक्रिया सुरू असली तरी बहुतेक राजकीय पक्ष शांत होते. फक्त शिवसेना उबाटा गटाने शनिवारी दोन उमेदवारांची नावे जाहीर केली होती. मात्र रविवारी महायुतीने पत्रकार परिषद घेत एकाचवेळी मोठी यादी जाहीर करत नगरपरिषद निवडणुकीला वेग दिला.

जिल्हाप्रमुख राहुल पंडीत यांच्या हस्ते जाहीर करण्यात आलेल्या महायुतीच्या यादीमध्ये भाजपला दोन जागा देण्यात आल्या.
कमळ चिन्हावरील उमेदवार:

प्रभाग २ ‘ब’: सौ. सुयोगा सुनील जठार

प्रभाग ७ ‘अ’: सौ. रसिका राजेंद्र कुशे


शिवसेना धनुष्यबाण चिन्हावरील उमेदवार:

प्रभाग १ ‘अ’: सौ. सान्वी सचिन रावण

प्रभाग १ ‘ब’: सौरभ संजय खडपे

प्रभाग २ ‘अ’: दिलीप दिवाकर चव्हाण

प्रभाग ३ ‘अ’: सौ. आरती गणेश जाधव

प्रभाग ३ ‘ब’: दिपक विनायक गुरव

प्रभाग ४ ‘ब’: दिलीप अमरे

प्रभाग ५ ‘अ’: किशोर काशिनाथ जाधव

प्रभाग ५ ‘ब’: सुमैय्या जिलानी काझी

प्रभाग ६ ‘ब’: खलील अहमदहसन सय्यद

प्रभाग ७ ‘ब’: असीम साजिद काजी

प्रभाग ९ ‘अ’: सौ. नेत्रा निलेश सोगम

प्रभाग ९ ‘ब’: संजय पांडुरंग ओगले

प्रभाग १० ‘अ’: सौरभ पेणकर

प्रभाग १० ‘ब’: साजिया हनिफ काझी

उर्वरित 4 उमेदवारांची नावे रविवारी सायंकाळी जाहीर करण्यात येणार होती. सर्व उमेदवार सोमवारी आपले अर्ज दाखल करणार आहेत.

पत्रकार परिषदेत आमदार किरण सामंत, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष एड. दीपक पटवर्धन, अविनाश लाड, भाजप प्रदेश महिला सरचिटणीस सौ. शिल्पा मराठे, राष्ट्रवादीचे बंटी वणजू, अमित केतकर, शिवसेना संघटक अशफाक हाजू, तालुकाप्रमुख दीपक नागले, रिपब्लिकन सेनेचे अनिरुद्ध कांबळे, प्रशांत कदम यांसह महायुतीचे जिल्हा व तालुका पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Total Visitor Counter

3367476
Share This Article