संगमेश्वर/दिनेश अंब्रे:संगमेश्वर येथील नावडी ग्रामपंचायतच्या वतीने शासनाच्या स्वच्छता ही सेवा 2025 अभियान अंतर्गत आठवडा बाजार परिसर तसेच केंद्र शाळा रामपेठ व अंगणवाडी रामपेठ तसेच इतर ठिकाणी स्वच्छता अभियान राबवले गेले.
स्वच्छता करण्यात आली तसेच राष्ट्रीय पोषण अभियान देखील राबवले गेले यावेळी रामपेठ नावडी अंगणवाडी येथे नावडीच्या सरपंच प्रज्ञा कोळवणकर, उपसरपंच विवेक शेरे, ग्रामविकास अधिकारी संजय शेलार, शिक्षिका रत्नप्रभा चोचे, रामपेठ अंगणवाडी सेविका पल्लवी शेरे मदतनिस शीतल अंब्रे, नावडी अंगणवाडी सेविका दिपाली अंब्रे, राधा धोत्रे व नागरीक ग्रामस्थ उपस्थित होते.तसेच ग्रामपंचायत कर्मचारी आदी ग्रामविकास अधिकारी संजय शेलार यांनी स्वच्छतेचे महत्व याबद्दल माहिती दिली.