GRAMIN SEARCH BANNER

रायगड : चालत्या एसटी बसचे चाक निखळले

Gramin Search
7 Views

रायगड: बोरिवली ते मुरुड चालत्या एसटीच्या उजव्या बाजूचे दोन्ही टायर अचानक बाहेर आले. बसचालकाच्या प्रसंगावधानामुळे अपघात टाळला.ही घटना आज मुरुड तालुक्यातील विहुर गावामध्ये घडली आहे.

महाड तालुक्यात महाड दापोली रोडवर एसटी महामंडळाच्या बसेसचा निसरड्या रस्त्यामुळे अपघात होण्याच्या घटना घडल्या असतानाच आज मुरुड तालुक्यात बोरवली वरून मुरुडला येणारी एस टी बस कामांक एम एच 20 बी एल. 3808 या क्रमांकाची बस विहुर गावाजवळ आली असता अचानक चालत्या गाडीमधून बसच्या उजव्या बाजूचे मागील दोन्ही टायर बाहेर आले. मात्र वाहनचालक यांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला.

Total Visitor Counter

2648096
Share This Article