ब्रेकिंग : रत्नागिरी कारवांचीवाडी बंधाऱ्यात पोहताना १६ वर्षीय मुलाचा मृत्यू, परिसरात हळहळ

Gramin Varta
1322 Views
Help!

रत्नागिरी : रत्नागिरी शहरालगतच्या कारवांचीवाडी परिसरातील धनावडेवाडी बंधाऱ्यात पोहताना बुडाल्याने १६ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. रविवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली असून परिसरात शोककळा पसरली आहे. मृत मुलाचे नाव सार्थक सुहास गुरव (वय १६, रा. गयाळवाडी, रत्नागिरी) असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सार्थक रविवारी सकाळी मित्रांसोबत कारवांचीवाडी धनावडेवाडी येथील बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेला होता. पोहत असताना पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने तो अचानक पाण्यात बुडाला. त्याच्या सोबत असलेल्या मित्रांनी आरडा ओरडा केला. मुलांच्या ओरडण्याने स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत सार्थकला पाण्याबाहेर काढले. त्यानंतर त्याला उपचारासाठी तात्काळ रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.

या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Total Visitors :
4622335
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *