खेड : तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावर कळंबणी गावानजीक समोरून येणाऱ्या धावत्या कारला वळण घेताना समोरून येणाऱ्या रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षाचालकासह कारस्वार आणि एक प्रवासी गंभीर जखमी झाला. शनिवारी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
धडक इतकी जोरदार होती की रिक्षा उलटून पडली आणि रिक्षाचालक, प्रवासी व कारस्वार हे तिघेही जखमी झाले. रिक्षाचे मोठे नुकसान झाले असून जखमी प्रवाशाला अधिक उपचारासाठी डेरवण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या अपघातामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. सायंकाळी उशिरापर्यंत कारचालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
खेडमधील कळंबणीजवळ कार-रिक्षा अपघातात तिघे गंभीर जखमी
