खेड: तालुक्यातील वाडीबीड गावात झालेल्या मुसळधार पावसामुळे वसंत खेडेकर यांच्या गुरांचा गोठा कोसळून मोठे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख बाळा खेडेकर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्याला दिलासा दिला. तसेच, त्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी बाळा खेडेकर यांनी तलाठी भंडारी यांच्याशी संपर्क साधून तातडीने पंचनामा करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. या प्रसंगी उपतालुकाप्रमुख संजय कदम आणि सामाजिक कार्यकर्ते रामेंद्र आखाडे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
अचानक झालेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्हाप्रमुखांनी दिलेल्या आश्वासनामुळे शेतकऱ्याला काहीसा दिलासा मिळाला आहे. स्थानिक प्रशासन लवकरात लवकर पंचनामा करून शेतकऱ्याला मदत करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.