राजापूर : हातिवले-जैतापूर सागरी महामार्गावर चौक-महाळुंगे परिसरात मंगळवारी सायंकाळी एक छोटा टेम्पो पलटी होऊन झालेल्या अपघातात जालना येथील नवोदय विद्यालयाचे 4 ते 5 विद्यार्थी जखमी झाले. या अपघाताने परिसरात खळबळ उडाली.
विद्यार्थी रत्नागिरीतील शालेय स्पर्धेसाठी आले होते. मंगळवारी ते पडवे येथील नवोदय विद्यालयात मुक्कामासाठी निघाले असताना हातिवले येथून जैतापूरकडे जाणाऱ्या टेम्पोतून प्रवास करत होते.
दरम्यान, चौक-महाळुंगे येथे वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो पलटी झाला. अपघातात चार ते पाच विद्यार्थी जखमी झाले असून एका विद्यार्थ्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे.
ब्रेकिंग: राजापूरमध्ये टेम्पो पलटी होऊन जालन्यातील विद्यार्थी जखमी
