रत्नागिरी: श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथे आजपासून भाद्रपदी गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. गुरुवार २८ ऑगस्टपर्यंत भाद्रपदी गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत.
रविवारी सकाळी श्रींची महापूजा झाली. आज सोमवारी, दि. २५ ऑगस्ट रोजी दुपारी ११ ते १२ यावेळेत सहस्रमोदक समर्पण होणार आहे. बुधवारी, दि. २७ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीच्यादिवशी दुपारी ४ ते ६ या वेळेत श्रींची पालखी मिरवणूक होणार आहे.
मंदिरात आजपासून दररोज सायंकाळी ७.०० ते ७.३० या वेळेत सामुदायिक आरती व मंत्रपुष्प, त्यानंतर ९.३० वाजेपर्यंत हभप सौ. वेदश्री वैभव ओक (रा. डोंबिवली) यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. गुरुवारी, दि. ४ सप्टेंबर रोजी वामन जयंतीच्या दिवशी दुपारी ११.३० ते २ यावेळेत श्रींच्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन गणपतीपुळे देवस्थानातर्फे करण्यात आले आहे.
रत्नागिरी : श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे भाद्रपदी सुरुवात
