रत्नागिरी: रत्नागिरीत कोकणनगर येथे ग्यारहवीं शरीफ निमित्त जुलूस (रॅली) उत्साहात संपन्न संपन्न झाली. ग्यारहवीं शरीफ हा इस्लामिक महीन्याप्रमाणे रबी-उल अव्वल च्या 11तारखेला साजरा केला जातो.ग्यारवी शरीफ़ हा सण इस्लामिक संत हजरत अब्दुल कादिर जिलानी यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो हा एक पवित्र दिवस आहे .हा दिवस एक्य आणि धार्मिक भावना वाढवणारा मानला जातो.
सदर जुलूस (रॅली) उद्यम नगर ते कोंकण नगर या मार्गावर अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात आली.या वेळी मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते,तसेच दावते इस्लामी रत्नागिरी शाखेचे मौलाना अल्ताफ कुरेशी तसेच गरीब नवाज रिलीफ़ फाउंडेशन चे रत्नागिरी चे अध्यक्ष फारुक जरीवाला उपस्थित होते.जुलुस (रॅली) व्यवस्थित पार पाडण्यासाठी रत्नागिरी शहर पोलिसांनी खूप सहकार्य केले