राजापूर: तालुक्यातील स्वामी गगनगिरी महाराजांचे तपोभूमी असलेल्या क्षेत्र केळवली येथील जागृत व प्रसिद्ध आश्रमात श्री गुरुपौर्णिमा उत्सव येत्या गुरुवारी दिनांक १० जुलै रोजी असंख्य भाविकांतर्फे श्रद्धा प्रेम भक्तीभावाने साजरा करण्यात येणार आहे.
त्यानिमित्ताने सकाळी स्वामी गगनगिरी महाराजांच्या मूर्तीचे पूजन झाल्यावर ७ ते ९ वाजेपर्यंत गगनगिरी महाराजांची प्रासादिक पोथी म्हणून प्रसिद्ध असलेल्या गुरु सप्तशती याचे सामूहिक पारायण तसेच त्यानंतर श्री गुरु पादुकांवर पूजा अभिषेक होईल. दुपारी होम हवनाचा कार्यक्रम संपन्न होईल तदनंतर आरती झाल्यावर सर्वांना महाप्रसाद देण्यात येईल.
या धार्मिक सोहळ्यात सायंकाळी ४ ते ६ या वेळेमध्ये स्वामी गगनगिरी लीलामृत ग्रंथाचे पारायण होईल नंतर भजन नामस्मरण झाल्यावर महाआरती होऊन या कार्यक्रमाची सांगता होईल.सदर सोहळ्यासाठी केळवली ग्रामस्थ व सेवेकरी भक्त मंडळी व तसेच परिसरातील भक्तांनी येऊन लाभ घ्यावा असे आवाहन गगनगिरी सेवाश्रम केळवली (मुंबई) यांनी केले आहे.
श्री क्षेत्र केळवली गगनगिरी आश्रमात गुरुपौर्णिमा उत्सवाचे भव्य आयोजन!
