रत्नागिरी/दिनेश पेटकर: प्राथमिक शिक्षकांच्या विविध अडचणी आणि महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने (AIPTF) केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची काल (मंगळवार, 29 जुलै 2025 रोजी) भेट घेतली. संघाचे केंद्रीय अध्यक्ष बसवराज गुर्रीकर आणि महासचिव कमलाकर त्रिपाठी यांनी या भेटीत मंत्र्यांशी सकारात्मक चर्चा केली.
या भेटीदरम्यान शिक्षकांच्या अनेक प्रमुख मागण्यांवर विचारविनिमय करण्यात आला. यामध्ये जुनी पेन्शन योजना ताबडतोब लागू करावी, शिक्षकांवर गुन्हे नोंद करताना त्यांच्या पार्श्वभूमीचा सखोल अभ्यास करून अनावश्यक गुन्हे दाखल करू नयेत, शिक्षकांना जनगणना आणि निवडणुका याव्यतिरिक्त कोणतीही अन्य कामे देऊ नयेत, तसेच सर्व राज्यांमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व शिक्षकांना आठवा वेतन आयोग लागू करावा या प्रमुख मागण्यांवर भर देण्यात आला.
अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष दिलीप देवळेकर यांनी ही माहिती दिली. रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षकांचे विविध प्रश्न आणि अडचणी सोडवण्यासाठी देवळेकर सर नेहमीच तत्पर असतात, असेही त्यांनी सांगितले.