राजापूर – राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांच्या पाठपुरावा आणि प्रयत्नातून राजापूर एस.टी. आगाराला यापूर्वी नव्या एस.टी. गाड्या मिळालेल्या असताना आताही त्यांच्या प्रयत्नातून नव्या पाच गाड्या उपलब्ध झाल्याची माहिती शिवसेनेचे तालुकाप्रमुख दिपक नागले यांनी दिली. या गाड्यांमुळे ग्रामीण भागातील प्रवाशांचा एस.टी.प्रवास अधिक सुखद आणि सुखकारक होणार असल्याचा विश्वास श्री. नागले यांनी व्यक्त केला आहे.
खाजगी गाड्यांच्या वाढत्या वापरामध्ये आजही ग्रामीण भागातील प्रवाशांना गावोगावच्या संपर्क आणि दळवळणासाठी एस.टी. गाड्या महत्वाच्या ठरत आहेत. मात्र, काहीवेळा गाड्या अपुर्या ठरत असल्याने काही मार्गावरील एस.टी.च्या फेर्या रद्द होत असल्याने प्रवाशांची चांगलीच गैरसोय होते. प्रवाशांची ही गैरसोय लक्षात घेवून राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांनी मतदारसंघातील एस.टी. डेपोंना एस.टी. गाड्या उपलब्ध व्हाव्यात म्हणून एस.टी. महामंडळाकडे सातत्याने प्रयत्न आणि पाठपुरावा केला. त्याच्यातून, राजापूर आगाराला मार्च महिन्यामध्ये गाड्या उपलब्ध झालेल्या आहेत. त्यानंतर, आता नव्याने पाच गाड्या उपलब्ध झाल्याची माहिती शिवसेनेचे तालुकाप्रमुख नागले यांनी दिली. या गाड्या उपलब्ध झाल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांचा एस.टी. प्रवास अधिक सुखद आणि सुखकारक झाल्याचे समाधान नागले यांनी व्यक्त केले आहे.
आमदार किरण सामंत यांच्या प्रयत्नातून राजापूर आगाराला पुन्हा नवीन पाच एसटी बस
