GRAMIN SEARCH BANNER

रायगडमध्ये रस्ते कामाच्या भ्रष्टाचाराविरोधात मनसेचे भीक मागो आंदोलन

Gramin Varta
14 Views

रायगड: कर्जत तालुक्यातील निकृष्ट रस्ते कामे आणि निधीतील भ्रष्टाचाराविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज भव्य ‘भीक मागो’ आंदोलन केले. हे आंदोलन नेरळ साई मंदिर चौकातून सकाळी ९:३० वाजता सुरू होऊन कर्जत येथील लोकमान्य टिळक चौक-राष्ट्रवादी भवन-शिवसेना भवन दरम्यान 12:45 रोजी संपन्न झाले.

मनसे पदाधिकाऱ्यांनी रस्त्यांसाठी आलेल्या हजारो कोटींच्या निधीचा अपव्यय कुठे गेला? ठेकेदारांच्या फायद्यासाठी निकृष्ट कामे का झाली. जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई का नाही? असे तीव्र प्रश्न उपस्थित केले गेले. नागरिकांकडून प्रतीकात्मक स्वरूपात भिक मागून गोळा केलेली १२४० रुपये रक्कम मुख्यमंत्री निधीस जमा करून सरकारला इशारा देण्यात आला.

लेखी आश्वासन देताच सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) व जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुढील कारवाईचे वचन दिल्यानंतर पाऊस कमी झालं की रस्त्यातील खड्डे भरण्यात येतील त्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले.

या आंदोलनात जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, जिल्हा सचिव अक्षय महाले, माथेरान शहराध्यक्ष संतोष कदम, तालुकाध्यक्ष यशवंत भवारे, तालुका सचिव प्रदीप पाटील, उपतालुकाध्यक्ष स्वप्निल शेळके तालुका प्रसिद्धी प्रमुख अवधुत अत्रे आदींसह मनसेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Total Visitor Counter

2648124
Share This Article