रत्नागिरी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सैतवडे नं. 02 ता. रत्नागिरी प्रशालेत नवरात्रौत्सवानिमित्त ग्रामस्थांच्या सहकार्याने शारदोत्सव कार्यकमाचे आयोजन करण्यात आले होते.देवीचे आवाहन, देवीचे पूजन, आरती, भजन, प्रसाद-अल्पोपहार, दांडिया नृत्य, रांगोळी रेखाटन,सजावट, विविध वेशभूषा अशा दिवसभर चाललेल्या भरगच्च कार्यक्रमाने संपूर्ण शारदोत्सव कार्यक्रमाला विशेष रंगत आली.या उत्सवानिमित्त बनवाडीचे ग्रामस्थ श्री. सूर्यकांत सागवेकर (अप्पा)यांनी शाळेला सरस्वती देवीची मूर्ती भेट स्वरूपात दिली. तर गुरुकृपा डेकोरेटर, पालघर- मुंबई चे मालक व सैतवडे बनवाडीचे सुपुत्र श्री. दिपक भिकाजी शिर्के व श्री. दिलीप भिकाजी शिर्के यांनी श्री. गंगाधर शिर्के, अमेश साईलकर, मनोहर कदम, प्रदिप वझे, सूर्यकांत सागवेकर, प्रमोद वझे, प्रमोद सावंत,मनोज सावंत, प्रथमेश दिलीप शिर्के, प्रविण वझे यांच्या सहकार्याने केलेल्या उत्कृष्ट डेकोरेशनने देवीची छान आरास झाली.रांगोळीकार सौ. प्रियांका वझे यांनी काढलेल्या रांगोळीने कार्यक्रमाची शोभा अधिक वाढली.माऊली प्रासादिक भजन मंडळबुवा श्री. सुनिल शंकर मिरजुळकर, प्रख्यात पखवाज वादक श्री. संदेश सुधाकर पारधी (रत्नागिरी), सौ. रोहिणी रामदास वझेआणि सहकारी यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवताना छान भजन सादर केले.
सैतवडे गावचे प्रथम नागरिक-सरपंच मा.श्री.साजिद लियाकत शेकासन, सदस्या- सौ. वैभवी साईलकर व ग्राम विकास अधिकारी श्री.प्रक्षाळे, सैतवडे गावचे ज्येष्ठ नागरिक श्री. रमेश शिर्के, श्री. सदानंद सावंत, श्री. रामदास वझे, श्री. वसंत नेवरेकर, शंकर मिरजुळकर व श्री. एकनाथ कदम, शाळा व्यवस्थापनचे माजी अध्यक्ष श्री. वैभव साईलकर, संदिप मेस्त्री तसेच न्यू इंग्लिश स्कूल, सैतवडेचा स्टाफ यांनी भेट देऊन संपूर्ण उत्सावाला शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापनाचे अध्यक्ष श्री. मनोज सदानंद सावंत, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. स्नेहा जाधव व शिक्षिका सौ. आशा कानडे मॅडम, शाळेचे विद्यार्थी, स्वयंपाकी सौ. रिया साईलकर व अंगणवाडी मदतनीस मोहिनी पवार, महिला मंडळ बनवाडी व चिंचबंदर सैतवडे यांनी विशेष मेहनत घेतली. शेवटी मुख्याध्यापिका सौ. स्नेहा जाधव मॅडम यांनी कार्यक्रम उत्तम रित्या पार पाडल्याबद्दल सर्वांचे ऋण व्यक्त केल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.







