GRAMIN SEARCH BANNER

‘मी दाऊदचा माणूस आहे’ अशी धमकी देणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा

शिरगाव गायवाडीतील प्रकार, कार लावण्याच्या वादातून तणाव

रत्नागिरी : शहरालगतच्या शिरगाव गायवाडी परिसरात गाडी लावल्याबाबत विचारणा केल्यावर “तू माझे काय करणार, मी दाऊदचा माणूस आहे, हे विसरू नको” अशी धमकी दिल्याप्रकरणी दोघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमेय श्रीकृष्ण दामले आणि रवींद्र वैजनाथ दामले (रा. शिरगाव गायवाडी, रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत.

या प्रकरणी पुष्कर माधव दामले (वय ५८, रा. शिरगाव गायवाडी, रत्नागिरी) यांनी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे २.४५ वाजता पुष्कर दामले न्यायालयीन काम आटोपून घरी जात असताना त्यांच्या जागेत संशयितांची कार उभी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. कारजवळच दोन्ही संशयित उभे होते.
याबाबत पुष्कर दामले यांनी विचारणा केली असता संशयितांनी त्यांना उद्धटपणे उत्तर देत धमकी दिल्याचा आरोप आहे. या तक्रारीच्या आधारे संशयितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३२९, ३५१ आणि ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकरणाचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस ठाणे करीत आहेत.

Total Visitor Counter

3473133
Share This Article