GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी येथे ‘इब्राहिम क्लिनिक डे केअर सेंटर’चे थाटात उद्घाटन

Gramin Varta
801 Views

रत्नागिरी : राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत यांच्या हस्ते उद्यमनगर, रत्नागिरी येथील ‘इब्राहिम क्लिनिक डे केअर सेंटर’चे उद्घाटन फीत कापून मोठ्या उत्साहात पार पडले. शिरगावसारख्या ग्रामीण भागात अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

याप्रसंगी बोलताना पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत यांनी डॉ. वलिद पावसकर यांनी घेतलेल्या पुढाऱ्याचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले, “शिरगावसारख्या ग्रामीण भागात उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचा डॉ. वलिद पावसकर यांचा संकल्प अत्यंत कौतुकास्पद आहे. दहा बेडचे रुग्णालय उभारणे हे केवळ धाडस नसून, ती खरी समाजसेवेची वाटचाल आहे.”

डॉ. पावसकर यांच्या सेवाभावावर आणि हातातील कौशल्यावर विश्वास व्यक्त करत मा. ना. सामंत पुढे म्हणाले, “त्यांच्या सेवाभावी वृत्तीमुळे आणि कौशल्यामुळे अनेक गरजू रुग्णांना नवीन जीवन प्राप्त होईल, याची मला खात्री आहे.” आरोग्यसेवेच्या माध्यमातून समाजसेवा करण्याच्या डॉ. पावसकर आणि त्यांच्या कुटुंबियांच्या या प्रयत्नांबद्दल त्यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले व त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच, हे रुग्णालय कोकणातील एक उत्कृष्ट आरोग्यसेवा केंद्र म्हणून विकसित व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

या उद्घाटन सोहळ्याला राहुलजी पंडित, बंड्याशेठ साळवी, सुदेशजी मयेकर, पावसकर मॅडम यांच्यासह अनेक मान्यवर, तसेच परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, बांधव आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘इब्राहिम क्लिनिक डे केअर सेंटर’च्या रूपाने ग्रामीण भागातील आरोग्यसेवेला बळ मिळाल्यामुळे ही घटना रत्नागिरी जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे.

Total Visitor Counter

3387166
Share This Article