GRAMIN SEARCH BANNER

हातखंबा तिठ्यावर कार-दुचाकीची धडक; दोघे जखमी

Gramin Varta
182 Views

रत्नागिरी : तालुक्यातील हातखंबा तिठा येथे कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दोघे जण जखमी झाल्याची घटना 20 फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास घडली. शुभम संतोष घवाळी (वय 30) आणि राहूल सुनील पालेकर (वय 26, दोघेही रा. खेडशी नाका, रत्नागिरी) अशी जखमींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शुभम घवाळी आणि राहूल पालेकर हे दुचाकी (एमएच-08 एएच 8877) वरून रत्नागिरीहून निवळीच्या दिशेने जात होते. त्याचवेळी कार (एमएच-03 बीडब्ल्यू 7331) ही रत्नागिरीहून पालीकडे जात होती. दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास हातखंबा तिठा येथील वळणावर कार आणि दुचाकी यांच्यात जोरदार धडक झाली.

या अपघातात दुचाकीवरील दोघेही जखमी झाले. त्यांना तात्काळ उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी येथे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Total Visitor Counter

3369307
Share This Article