GRAMIN SEARCH BANNER

मंडणगडमध्ये रस्त्यावर दिसली मगर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

मंडणगड : तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कुंभार्ली येथील शिवशंकर मंदिर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंदिरालगत असलेल्या पुरातन तळ्यातील मोठ्या मगरी रस्त्यावर येऊ लागल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

या तळ्यात दोन ते तीन मोठ्या तसेच अनेक लहान मगरींचे अस्तित्व दिसून येत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. सावित्री खाडीस लागून असलेल्या ओढ्यातून या मगरी तळ्यात पोहोचल्या असाव्यात, असा अंदाज वर्तवला जात आहे. सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे तलावातील जलसाठा वाढल्याने मगरी बाहेर आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, रस्त्यावर आलेल्या या मगरी वाहनांच्या प्रकाशाच्या दिशेने येत असल्याने वाहनचालकांमध्येही घबराट पसरली आहे. परिणामी परिसरात भीतीचे सावट पसरले असून नागरिकांनी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.

Total Visitor Counter

2475143
Share This Article