विभागीय स्पर्धेसाठी निवड
संगमेश्वर ( प्रतिनिधी ):- व्यापारी पैसा फंड संस्था संगमेश्वर संचलित पैसा फंड इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय संगमेश्वर येथे अकरावी वाणिज्य शाखेत शिकणारा ओंकार श्रीपत घडशी याने डेरवण येथे नुकत्याच संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय अडथळा शर्यतीत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.ओंकारची निवड विभागीय स्पर्धेसाठी झाली आहे.
डेरवण येथील क्रीडा संकुलात १६ व १६ ऑक्टोबर रोजी विविध प्रकारच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या. यामध्ये पैसा फंड इंग्लिश स्कूल संगमेश्वरचा ओंकार श्रीपत घडशी याने ११० आणि ४०० या दोन टप्प्यातील अडथळा शर्यतीत, विक्रमी वेळेत अंतर कापून दोन्ही प्रकारात प्रथम क्रमांक प्राप्त केला. ओंकारच्या या यशाबद्दल आज प्रशालेत व्यापारी पैसा फंड संस्थेचे सचिव धनंजय शेट्ये यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन त्याला सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक सचिनदेव खामकर, पर्यवेक्षक प्रकाश दळवी, क्रीडा शिक्षक नवनाथ खोचरे उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष अनिल शेट्ये, उपाध्यक्ष किशोर पाथरे, सचिव धनंजय शेट्ये, संस्था सदस्य संदीप सुर्वे रमेश झगडे यांनीही ओंकारच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेच्या वतीने त्याचे आणि क्रीडा शिक्षक नवनाथ खोचरे यांचे खास अभिनंदन करून त्यांना विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
पैसा फंडचा ओंकार घडशी अडथळा शर्यतीत जिल्हास्तरावर प्रथम
