संगमेश्वर : तालुक्यातील डेरवण येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत संगमेश्वर मधील पैसा फंड इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी इयत्ता आठवीतील अजिंक्य अमोल शिंदे व इयत्ता नववीतील प्रथमेश सुजित शेट्ये या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक प्राप्त करून सुयश प्राप्त केले.
प्रशालेचे क्रीडा शिक्षक नवनाथ खोचरे यांचे या विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांची निवड विभागीय स्पर्धेसाठी झाल्यामुळे संस्थेचे अध्यक्ष अनिल शेट्ये, सचिव धनंजय शेट्ये, मुख्याध्यापक सचिन देव खामकर, ज्येष्ठ शिक्षक प्रकाश दळवी, शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
सामाजिक कार्यकर्ते दिनेश अंब्रे यांनी प्रशालेला भेट देऊन दोन्ही विद्यार्थ्यांना शालेय भेटवस्तू व पुस्तक देऊन सामाजिक कार्यकर्ते गणेश मारुती पवार ( कोंड असुर्डे ) व गायत्री परिवाराचे कार्यकर्ते सुधीर माने ( शिपोषी) यांच्या शुभहस्ते गौरव केला.