GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राच्या निकिताचे नेत्रदीपक यश

Gramin Varta
41 Views

अखिल भारतीय विद्यापीठ योग स्पर्धेसाठी निकिता लाड हिची निवड

6 व्या महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स चॅम्पियनशिप मध्ये निकिताला कांस्य पदक

रत्नागिरी : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्र येथील बी ए योगशास्त्र विषयातील प्रथम वर्षाची विद्यार्थिनी निकिता लाड हिने योगाच्या माध्यमातून नेत्रदीपक यश संपादित केलेले आहे.
निकिता हिने  6 व्या महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भाग घेतला. रत्नागिरी मध्ये पार पडलेल्या निवड फेरीत तिची निवड झाली होती. यानंतर चंद्रपूर येथील आनंदवन ठिकाणी झालेल्या राज्यस्तरावरील स्पर्धेत 18 ते 28 या वयोगटात Leg balance event आणि  Back bend event या दोन्ही प्रकारात कांस्य पदक प्राप्त झाले.

दरम्यान विश्वविद्यालयाच्या वतीने प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज योग कक्ष येथे आंतर महाविद्यालयीन योगासन स्पर्धा निवड फेरी घेण्यात आली होती. यात एकूण २७ विद्यार्थ्यांचा सहभाग होता. यातील १२ विद्यार्थ्यांची बंगळुरु व चेन्नई येथे होणाऱ्या अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ज्यात निकिता लाड हिचा देखील समावेश आहे. त्यामुळे या स्पर्धेच्या माध्यमातून निकिता लाड विश्ववाद्यालय आणि उपकेंद्राचे राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करणार आहे. निकिता लाड हिच्या या यशाबद्दल संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरु प्रा. अतुल वैद्य, रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉ दिनकर मराठे तसेच उपकेंद्रातील योग विभागातील प्रा अविनाश चव्हाण, प्रा. अक्षय माळी , प्रा कश्मिरा दळी यांनी अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहे.

Total Visitor Counter

2659794
Share This Article