खेड : तालुक्यातील लोटेमाळ येथील बँक ऑफ इंडिया शाखेत अज्ञात चोरट्यांनी चोरी करून सुमारे ४५,५०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना १३ जुलै रोजी सायंकाळी ४.३० ते रात्री ८.४५ या वेळेत घडली. या प्रकरणी १४ जुलै रोजी दुपारी ३.५० वाजता खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी संदेश दिलीप खरात (वय ३६, रा. चिपळूण) यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, अज्ञात चोरट्याने लोखंडी कटावणी, हातोडा आणि ब्लेड यांचा वापर करून बँकेच्या कॅशिअर केबिनमागील स्लायडिंग खिडकीची काच फोडली. त्यानंतर लोखंडी ग्रिल तोडून व वाकवून चोरट्याने बँकेच्या कार्यालयात प्रवेश केला. कार्यालयात ठेवलेला एच.पी. कंपनीचा ४० हजार रुपयांचा लॅपटॉप, ५ हजारांचा डॉक्युमेंट स्कॅनर आणि ५०० रुपयांची चॉकलेटी रंगाची मोठी सुटकेस असा एकूण ४५,५०० रुपयांचा ऐवज चोरीला गेला. या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खेडमध्ये बँक फोडून ४५ हजारांचा ऐवज चोरीस
