विनायक सावंत /सावर्डे : मुंबई-गोवा महामार्गावर आज सकाळी साडेअकराच्या सुमारास भीषण अपघात घडला. सावर्डे येथे उभ्या असलेल्या ट्रेलरला दुचाकीस्वाराने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.अजय अशोक सुतार (29, वालोटी वाडी, सावर्डे, चिपळूण ) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.
प्राथमिक माहितीनुसार, ट्रेलर मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात असताना चालकाने सावर्डे येथे नाश्त्यासाठी गाडी थांबवली होती. त्याचवेळी चिपळूनहून येणाऱ्या दुचाकीस्वाराने ट्रेलरला मागून धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की दुचाकीस्वाराच्या डोक्याला गंभीर मार लागला आणि तो घटनास्थळीच मृत झाला.
अपघाताची माहिती मिळताच सावर्डे पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती, मात्र पोलिसांनी त्वरीत हस्तक्षेप करत ती पूर्ववत केली. अपघाताचा पंचनामा करण्यात येत आहे.
ब्रेकिंग : सावर्डे येथे दुचाकीची ट्रेलरलला धडक, दुचाकीस्वार जागीच ठार

Leave a Comment