GRAMIN SEARCH BANNER

टीबी मुक्त भारत अभियानाअंतर्गत तळवडे येथे एक्स-रे व CYTB तपासणी शिबिर संपन्न

Gramin Varta
16 Views

राजन लाड / जैतापूर

ग्रामपंचायत तळवडे, आयुष्यमान आरोग्य मंदिर तळवडे आणि क्षयरोग पथक राजापूर, जिल्हा क्षयरोग केंद्र रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 6 ऑगस्ट 2025 रोजी ‘टीबी मुक्त भारत अभियान’ अंतर्गत एक्स-रे व CYTB तपासणी शिबिराचे आयोजन ग्रामपंचायत तळवडे येथे करण्यात आले.

या शिबिराचे आयोजन अत्यंत सुयोजित पद्धतीने करण्यात आले असून एकूण 185 रुग्णांची तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान एक्स-रे आणि CYTB चाचण्या करण्यात आल्या.

कार्यक्रमास तळवडे ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. गायत्री साळवी, उपसरपंच श्री. शांताराम साळवी, सदस्य सौ. प्रेरणा गुरव यांची उपस्थिती लाभली.

जिल्हास्तरावरून जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. महेंद्र गावडे सरांचे मार्गदर्शन लाभले. याशिवाय श्रीकांत सावंत (PPM कोऑर्डिनेटर), श्री मंगेश पाटील (जिल्हा सुपरवायझर), श्रीहांगे (एक्स-रे टेक्निशियन), श्री राहुल कोकणे (STS), श्रीमती आचल मळेकर (STLS), तसेच राजापूर TB पथक व करवली पीएचसी येथून श्री टी. बी. पाटील, श्री के. व्ही. भांडे, श्रीमती पाटणकर यांचेही सक्रिय सहकार्य लाभले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक-सेविका, गटप्रवर्तक आणि आशा कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले.

या उपक्रमामुळे स्थानिक पातळीवर क्षयरोग प्रतिबंधासाठी जनजागृती होत असून टीबी मुक्त भारत घडविण्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल टाकण्यात आले आहे.

Total Visitor Counter

3206073
Share This Article