तेलीवाडीतील सार्वजनिक स्वच्छतागृहात सुविधा अभावी नागरिक त्रस्त!
राजापूर (प्रतिनिधी): तेलीवाडी येथील सार्वजनिक स्वच्छतागृहात गेल्या सहा महिन्यांपासून वीज आणि पाण्याची सुविधा नसल्यामुळे स्थानिक महिलांना आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या गंभीर प्रश्नावर समाजकार्यकर्त्या उर्मिला अमोल बाकळकर यांनी प्रशासनाला जाब विचारला आहे.
बाकळकर यांनी सांगितले की, लोकसंख्येच्या प्रमाणात महिलांसाठी आणखी दोन संडासांची बांधणी तातडीने करण्यात यावी, तसेच विद्यमान स्वच्छतागृहात वीज व पाण्याची व्यवस्था त्वरित सुरू करण्यात यावी. सहा महिन्यांपासून लाईट बंद असून, प्रशासनाकडून या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकांमध्ये रोष आहे.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला या प्रश्नावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली असून, उर्मिला बाकळकर यांनी “आता हा विषय धारेवर धरला आहे, तो सोडविल्याशिवाय शांत बसणार नाही,” असा इशारा दिला आहे.
राजापुरातील उर्मिला बाकळकर यांनी प्रशासनाला विचारला जाब
