GRAMIN SEARCH BANNER

लांजातील खांबडवाडी मित्र मंडळ नवरात्रोत्सवाचे 28 व्या वर्षात पदार्पण

Gramin Varta
24 Views

लांजा : तालुक्यातील गोळवशी गावातील खांबडवाडी मित्र मंडळ यंदा शारदीय नवरात्रोत्सवाचा २८वा वर्धापन दिन साजरा करणार आहे. गेली २७ वर्षे गाव व परिसरातील नागरिकांच्या सहभागातून हा उत्सव सातत्याने रंगतदार पद्धतीने पार पडत आला आहे.

या वर्षीच्या नवरात्रोत्सवासाठी मंडळाने सामाजिक, सांस्कृतिक आणि विधायक उपक्रमांचे वैविध्यपूर्ण नियोजन केले आहे. देवीचे आगमन, दैनंदिन पूजा-आरती, भजन, शालेय विद्यार्थ्यांचे सादरीकरण, विद्यार्थी गुणगौरव, मनोरंजक खेळ, समाज प्रबोधनपर कार्यक्रम, भजनाचे डबलबारी सामने, वेशभूषा स्पर्धा, महिलांचे विशेष कार्यक्रम आणि गरबा यांचा समावेश आहे.

भाविकांसाठी दररोज महाप्रसादाची सोय करण्यात आली असून गाव, तालुका आणि जिल्हा पातळीवरील विविध मान्यवर उत्सवाला भेट देऊन मंडळाच्या सामाजिक कार्याचे कौतुक करतात. उत्सवामुळे गावाचा नावलौकिक अधिक वाढला असून यंदाही नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

Total Visitor Counter

2649761
Share This Article