पाली: डी.जे. सामंत इंग्लिश मीडियम स्कूल,पाली मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व समजावून देण्यासाठी आणि त्यांना निरोगी जीवनासाठी प्रोत्साहित करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी ‘योगा फिटनेस, रत्नागिरी’च्या गतिशील संचालिका, योग शिक्षिका आणि पोषणतज्ञ प्रियंका विचारे तसेच त्यांच्या सहाय्यिका सोनाली आयरे उपस्थित होत्या.
प्रियंका विचारे यांनी योगाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व, त्याचे शारीरिक आणि मानसिक फायदे यावर प्रकाश टाकला. त्यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रकारची योगासने करून दाखवली आणि विद्यार्थ्यांकडून ती उत्साहाने करून घेतली. यामुळे विद्यार्थ्यांना योगाचे प्रत्यक्ष अनुभव घेता आले.यावेळी मुख्याध्यापिका नूतन कांबळे यांनी योगाचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित केले. त्यांनी विद्यार्थ्यांना नियमितपणे योगाभ्यास करण्याचे आवाहन केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.
फोटो ओळी- पाली येथील डी.जे. सामंत इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये योग