अचानक उलटी झाली आणि 31 वर्षीय महिलेचा आकस्मिक मृत्यू; दापोलीत हळहळ

saurabhsalvi26@gmail.com
1 Min Read

दापोली : वाकवली मराठवाडी येथील साक्षी सचिन देवरुखकर (31) या महिलेचा उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी दापोलीत घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, 21 नोव्हेंबरच्या सकाळी साक्षी यांना अचानक उलटीचा त्रास सुरू झाला. तब्येत अधिक बिघडू लागल्याने कुटुंबीयांनी त्यांना तत्काळ दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, पुढील दिवशी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाल्याचे रुग्णालयाने कळविले. या प्रकरणी दापोली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *