GRAMIN SEARCH BANNER

दापोली : चोरीच्या तपासासाठी आलेल्या श्वानपथकाला चोराचा मागोवा काढण्यास अपयश

Gramin Varta
67 Views

दापोली : जालगाव लष्करवाडी परिसरात भरदिवसा झालेल्या मोठ्या चोरीमुळे खळबळ उडाली आहे. तब्बल 12 लाख 10 हजार रुपयांचा माल चोरट्यांनी लंपास केल्यानंतर पोलिसांनी तातडीने श्वानपथक, ठसे तज्ज्ञ आणि फॉरेन्सिक टीमला पाचारण केले. मात्र श्वानपथकाला चोरट्याचा ठोस माग काढण्यात यश आले नाही.

घटनास्थळी तपास यंत्रणांनी विविध कोनातून शोधमोहीम राबविली. पोलिसांनी परिसरात तपासाची व्याप्ती वाढवून चोरट्यांचा धागा लागावा म्हणून सर्व शक्य दिशांनी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. अद्याप आरोपींचा ठावठिकाणा लागत नसला तरी दापोली पोलिसांनी लवकरच चोरट्यांना जेरबंद करू, असा विश्वास व्यक्त केला आहे.

या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता अधिनियम 2023 अंतर्गत कलम 305(अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे

Total Visitor Counter

3377160
Share This Article