रत्नागिरी : येथील रेल्वेस्थानक परिसरातील एका वडापाव सेंटरवर ठेवलेला मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना ६ डिसेंबर रोजी पहाटे सुमारे चार वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी उमेश प्रकाश सुर्वे (वय ५०, रा. वरची निवेंडी, रत्नागिरी) यांनी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीनुसार, रेल्वेस्थानक परिसरातील वडापाव सेंटरवर कामकाज सुरू असताना मोबाईल काउंटरवर ठेवलेला असताना अज्ञात व्यक्तीने संधी साधून तो लांबवला. चोरीची घटना लक्षात येताच संबंधितांनी पोलिसांत धाव घेतली.
या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
रत्नागिरी रेल्वेस्थानक परिसरात मोबाईल चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल







