गोवळकोट येथे जिल्हास्तरीय नगराध्यक्ष चषक खो-खो स्पर्धेचा थाटात शुभारंभ

saurabhsalvi26@gmail.com
1 Min Read

चिपळूण : चिपळूण शहरातील गोवळकोट येथील वक्रतुंड क्रीडा मंडळ आयोजित जिल्हास्तरीय नगराध्यक्ष चषक खो-खो स्पर्धेचा शुभारंभ सोमवारी सायंकाळी माजी आमदार सदानंद चव्हाण व नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या हस्ते करण्यात आला.

ही शालेय स्तरावरील स्पर्धा असून ती सलग तीन दिवस चालणार आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळांचे अनेक संघ सहभागी झाले आहेत.

फीत कापून व श्रीफळ वाढवून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष रूपाली दांडेकर, आरोग्य सभापती शुभम पिसे, बांधकाम सभापती कपिल शिर्के, नगरसेवक प्रमोद बुरटे, उदय जुवळे, विकी लवेकर, राष्ट्रीय पंच प्रशांत देवळेकर, शिवसेनेचे पालिकेतील गटनेते अंकुश आवले, तुषार रेडीज, भैय्या वरवटकर, दया जुवळे, नगरसेवक संजय गोताड व विलासशेठ खेराडे आदी उपस्थित होते.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी वक्रतुंड क्रीडा मंडळाचे अध्यक्ष अभिमन्यू बुरटे, प्रतीक गोरीवले, ऋषिकेश हरवडे, वृषभ बेचावडे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते विशेष परिश्रम घेत आहेत.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *