देवरुख:संगमेश्वर तालुक्यातील नांदळज येथे बहुजनांचे कैवारी विलास होडे यांचा स्मृतिदिन विलास होडे प्रबोधिनीच्यावतीने १ जुलै रोजी विविध सामाजिक उपक्रमांकमानी साजरा केला जाणारा आहे.
नांदळज गोवळकरवाडी येथे होडे यांच्या निवासस्थानी सकाळी ११ वाजता या कार्यक्रगाला प्रारंभ होणार असून अध्यक्षस्थान सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते भुषविणार आहेत. वृक्षारोपण, शिष्यवृत्ती प्रदान, सागाजिक कार्यकर्ते पुरस्कार वितरण, गान्यवर गनोगते असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे.
उजगावच्या माजी सरपंच सुहासिनी पांचाळ व कोसुंब येथील श्रीराम बेलवलकर यांना सामाजिक कार्यकर्ते पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. हिंदुजा ग्रुपचे निवृत्त अधिकारी विश्वनाथ सावंत, नांदळज सरपंच दिलीप गोवळकर यांची प्रगुख उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन विनय होडे, विवेक होडे यांनी केले आहे.