GRAMIN SEARCH BANNER

संगमेश्वर कनकाडी येथे 17 वर्षीय युवकाची आत्महत्या

Gramin Varta
9 Views

संगमेश्वर : तालुक्यातील कनकाडी (गराटेवाडी) येथील हर्षद संजय रांधिम (वय १७) या तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

मंगळवारी रात्री जेवण करून हर्षद झोपला होता. बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास घरच्यांनी मागील पडवीत त्याला गळफास घेतलेल्या स्थितीत पाहिले. हे दृश्य पाहताच आई व बहिणीने हंबरडा फोडला. घरातील आरडाओरड ऐकून शेजारी धावून आले.

घटनेची माहिती पोलीस पाटील समीक्षा खांदारे यांनी साखरपा पोलीस दूरक्षेत्रात दिली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक नामदेव जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शांताराम पंदेरे व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आला.

हर्षदने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप समजू शकले नाही. पोलीसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास देवरूखचे पोलीस निरीक्षक उदय झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. मृताच्या पश्चात आई, वडील व बहीण असा परिवार आहे.

Total Visitor Counter

2648156
Share This Article